Ad will apear here
Next
‘अशांततेपेक्षा नवनिर्माणाचा ध्यास घ्या’
उधमपूर : ‘काश्मीरच्या युवकांना पर्यटन हवे की दहशतवाद? काश्मीरमध्ये काही तरुण दगडफेक करत आहेत, तर काही तरुण दगड फोडून पायाभूत सुविधा भक्कम करण्याचे काम करत आहेत. तुम्हाला नवनिर्माण करायचे आहे, की अशांतता निर्माण करायची आहे याचा निर्णय तुम्हीच घ्यावा. राज्याचा विकास आणि समृद्धीसाठी दहशतवादापेक्षा पर्यटनाचा पर्याय निवडा,’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. 
काश्मीरमध्ये मोदी यांनी रविवारी (दोन एप्रिल) भारतातील सर्वांत मोठ्या बोगद्याचे उद्घाटन केले. त्यानंतर ते बोलत होते. जम्मू-काश्मीरमधील नाशरी ते चेनानी या मार्गावर हा बोगदा तयार करण्यात आला आहे. या बोगद्यामुळे जम्मू ते श्रीनगर हे अंतर तब्बल ३० किलोमीटरने कमी झाले आहे. हा बोगदा सामाजिक, आर्थिक आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा आहे.

या वेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, तसेच जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती आदी मान्यवर उपस्थित होते. जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर हा बोगदा तयार करण्यात आला आहे. ९.२८ किलोमीटर लांबीच्या या बोगद्यामुळे जम्मू- श्रीनगर या प्रवासातील वेळ दोन तासांनी वाचणार आहे. अंतर घटल्याने मोठ्या प्रमाणावर इंधनबचतही होणार आहे.
‘गेल्या चाळीस वर्षांमध्ये काश्मीरमध्ये केवळ हिंसाचारच झाला. हिंसाचाराऐवजी या ठिकाणी पर्यटनाच्या विकासाबद्दल बोलले गेले असते आणि काश्मीरच्या जनतेने ४० वर्षे पर्यटन विकासात खर्ची घातली असती, तर काश्मीर अव्वल दर्जाचे पर्यटनस्थळ झाले असते,’ असे प्रतिपादन पंतप्रधान मोदींनी केले. हिंसेने कुणाचेही भले होणार नाही, हिंसेने सर्वाधिक नुकसान जम्मू आणि काश्मीरमधील लोकांचेच झाले असल्याचेही ते म्हणाले.

 ‘सीमेपलीकडच्या पाकिस्तानला आपलाच देश सांभाळता येत नाही,’ असा टोला लगावून, ‘भारताचा भाग असलेल्या पाकव्याप्त काश्मिरातील जनतेने काश्मीर खोऱ्याचा विकास बघावा आणि त्यांचा भूभाग बळकावणाऱ्यांनी किती नुकसान केले याचा विचार करावा. पाकिस्तान स्वतःचीही काळजी घेऊ शकत नाही,’ असेही पंतप्रधानांनी पाकिस्तानला सुनावले.

‘या बोगद्यामुळे व्यापाराला, पर्यटनाला चालना मिळणार आहेच; पण प्रत्यक्ष अंतर कमी झाल्याने काश्मीरमधील लोकांच्या मनातील दुरावाही कमी होईल,’ असे जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/KZYPBB
Similar Posts
‘नेहरू, इंदिराजींनंतर मोदीच’ नवी दिल्ली : ‘देशाचे पहिले पंतप्रधान आणि आयर्न लेडी इंदिरा गांधी यांच्यानंतर सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सर्वांत यशस्वी पंतप्रधानांच्या यादीत क्रमांक लागू शकतो,’ असे मत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विचारवंत डॉ. रामचंद्र गुहा यांनी व्यक्त केले. ‘मोदींच्या करिष्म्याला जाती आणि भाषांच्या मर्यादा राहिलेल्या नाहीत,’ असेही ते म्हणले
उचित ‘अर्थ’बोध महत्त्वाचा जागतिक बँकेने नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालात व्यवसाय सुलभता अर्थात ‘ईझ ऑफ डुइंग बिझनेस’मध्ये भारताने १३०व्या स्थानावरून यंदा शंभराव्या स्थानापर्यंत झेप घेतली आहे. हे यश प्रशंसनीय असले, तरी त्यातील मर्यादा लक्षात घेऊन छुप्या आव्हानांचा बोध घेणे आवश्यक आहे.
सुट्टीत भटका ‘वीणा वर्ल्ड’च्या साथीनं आपला भारत हा एक असा देश आहे, की जिथलं सौंदर्य अंतरागणिक बदलतं...एक असा देश जिथं कित्येक संस्कृतींचा मिलाफ होतो. शेकडो किलोमीटरचे रम्य समुद्रकिनारे, उंचच उंच पर्वतराजी, घनदाट अभयारण्ये, बर्फाने आच्छादलेला हिमालय, दूरवर पसरलेलं वाळवंट असे वैविध्यपूर्ण भौगोलिक आविष्कार. लाखो वर्षांच्या इतिहासाचा वारसा जपवणारी
लष्करी छावणीवर हिमस्खलन, १ अधिका-याचा मृत्यू - जम्मू काश्मीर भारत – पाकिस्तान सीमारेषेजवळ सोनमर्गमध्ये भारतीय लष्कराची छावणी आहे. या छावणीवर बुधवारी दुपारी हिमस्खलन झाले. या घटनेत काही जवान बर्फाच्या ढिगा-याखाली अडकले होते. यातील सहा जणांची सुटका करण्यात यश आले. तर एका जवानाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू असून ढिगा-या खाली आणखी किती जवान आहे हे अद्याप समजू शकलेले नाही

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language